मराठी भाषा गौरव दिन

लातूर : नेहरू उच्च माध्यमिक विद्यालय चिंचोली (ब.) तालुका लातूर येथे वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी कुसुमाग्रज यांनी अथक परिश्रम घेतले.त्यामुळे मी दैनंदीन व्यवहारातील,कार्यालयातील व आप्तेष्ठ-मित्र परिवारातील बोलने मराठीतूनच करेन याची प्रतिज्ञा उपक्रमशिल शिक्षक नजीऊल्ला शेख यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उपस्थितांना दिली ॥ दिली.या प्रसंगी प्रतिज्ञा घेताना लातूर गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ - संतोष सूर्यवंशी,मुख्याध्यापक आसबे - एच.एस. , पर्यवेक्षक भालेकर व्ही. एन. , लिपिक भडंगे पी.जी. , सहशिक्षक माळी पी.एच. , पोलिस हेड कॉन्स्टेबल गिरी जी.एल. , मुळे एम.एन. आदिंची उपस्थिती होती.