वाधवान कुटुंबियांच्या महाबळेश्वरवारीचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे

वाधवान कुटुंबियांच्या मुंबई, दि. १० (वृत्तसंस्था) - वाधवान कुटुंब राज्याचे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांचे पत्र घेऊन लॉकडाऊनमध्येही मुंबईहून महाबळेश्वरमध्ये पोहोचल्यानंतर सरकारवर विशेषत : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. त्यातच या संदर्भात प्रश्न उपस्थित करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उत्तर देण्याची मागणी सरकारकडे के ली आहे. फडणवीस म्हणाले की, एवढ्या मोठ्या चुकीचे काय परिणाम होतील माहित असूनही वरिष्ठ आयपीएस अधिकारी असे कृत्य करेल, हे शक्य नाही, कोणाच्या आदेशाने किंवा आशीर्वादाने हे घडले? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. येस बँक घोटाळ्याच्या वाधवान कुटुंबातील २३ जण लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही सात गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचे पत्र मिळाल्यामुळे सामान्यांना एक न्याय आणि श्रीमंत धेंडांना वेगळा न्याय कसा? त्यातही घोटाळ्याच्या आरोपींना संचारबंदीत फिरण्याची मुभा कशी काय मिळाली यासह अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान सातारा पोलीस अधीक्षकांना फोन करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाधवान कुटुंबावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे, यावरुन सरकारला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही धारेवर धरले. त्यांनी टिवट करत महाराष्ट्रात बलाढ्य आणि श्रीमंताना लॉक डाऊन नाही का? पोलिसांच्या अधिकृत परवानगीने काही जण महाबळे श्वरमध्ये सुट्टीला गेले आहेत. एवढ्या मोठ्या चुकीचे काय परिणाम होतील माहित असूनही वरिष्ठ आयपीएस अधिकारी असे कृत्य करेल, हे शक्य वाटत नाही, कोणाच्या आशीर्वादाने हे घडले? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. मुंबईच्या वांद्र्यातील पाली हिल परिसरात वाधवान कुटुंब राहते . हे कु टुब मुबईहून महाबळेश्वरमध्ये पोहोचले असता, आहे, स्थानिकांनी २३ जणांना पाहून याचा विरोध के ला आणि लॉक डाऊ नदरम्यान हे लोक महाबळेश्वरला कसे पोहोचले, काही रहिवाशांनी याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये केली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वरमध्ये पोहोचलेल्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या वाधवान कुटुंबातील सर्व सदस्यांना विलग करण्यात आले आहे. महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्यांमध्ये कुटुंबातील महिला आणि मुलांचाही समावेश लॉकडाऊनदरम्यान वाधवान कुटुंबीयांना प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अनिल देशमुख यांनी रात्री दोन वाजत या संदर्भात टिवटरवरुन माहिती दिली, लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबातील २३ जण सात गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचे पत्र मिळाल्यामुळे सामान्यांना एक नाही आणि श्रीमंत धेंडांना, त्यातही घोटाळ्याच्या आरोपींना संचारबंदीत फिरण्याची मुभा कशी काय मिळाली यांसह अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.