महाराष्ट्र सायबरची लाकडाऊनच्या काळात प्रभावी कामगिरी

राज्यात एकूण १६१ गुन्हे दाखल तर ३६ आरोपींना अटक


__ मुबई, दि. १० - लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र सायबर विभागाची कारवाई अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे. आतापर्यंत राज्यात एकूण १६१ गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती सायबर विभागाच्या वतीने देण्यात आली आहे सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉक डाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर, या गुन्हेगारांना व समाजकंटकांना पकडण्यासाठी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यासाठी सर्व जिल्हा पोलीस प्रशासनाबरोबर समन्वय साधून काम करत आहे. महाराष्ट्र सायबर याकरिता टिकटॉक, फेसबुक, ट्रिटर व अन्य सोशल मीडिया वर चालणाऱ्या गैरप्रकारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. राज्यभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. बीड २२, कोल्हापूर १३, पुणे ग्रामीण १२, मुंबई ११, जळगाव १०, जालना ९, नाशिक ग्रामीण ८, सातारा ७, नांदेड - ६, नागपूर शहर ५, नाशिक शहर ५, परभणी ५ ठाणे शहर ४, बुलढाणा ४, गोंदिया ३, भंडारा ३, अमर रावती ३, लातूर ३, नंदुरबार २, नवी मुंबई २, उस्मानाबाद २, हिंगोली १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी ८९ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी ४१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, टिक टॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी ३ गुन्हे व ट्रिटरद्वारे आक्षेपार्ह ट्रिट केल्याप्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत, तर अन्य सोशल मीडि याचा (ऑडिओ क्लिप्स, युट्युब) गैरवापर केल्याप्रकरणी २३ गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामध्ये आतापर्यंत ३६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर, बीड, जालना, लातूर, जळगाव, परभणी, पुणे ग्रामीण या सर्व ठिकाणी नवीन । गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या गुन्ह्यांमध्ये आरोपींनी आपल्या फेसबुक व्हाट्सप व अन्य सोशल मीडियाचा (social media) वापर करून कोरोना संकटाला धार्मिक रंग देऊन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या, ज्यामुळे त्या परिसरात अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.