अड.वैभव पाटील विटा दि. १० (वार्ताहर) - अचानक जर विदारक परिस्थिती निर्माण झाली तर रक्ताचा तुट वडा भासू नये, म्हणून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सामाजिक संघटनांना रक्तदान शिविर आयोजित करण्याचे आवाहन केले होते याच आवाहनाला प्रतिसाद म्हणून विट्यातील काही संघटनातील युवकांना शिबिर घेण्याचे सुचवले होते .यामध्ये श्रीराम नगर ग्रुप, अंगण गूप, आम्ही विटेकर कल्चरल गूप, स्वराज्य यंगस्टार ग्रुप, मुजावर वस्ती या सर्व संघटनांनी मिळून सोशल डिस्टन्सिंग चे तंतोतंत पालन करत आज शक्रवार दि.१० रोजी श्री भैरवनाथ मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या रक्तदान शिबीरात १७७ बाटल्या रक्त संकलन करण्यात आल्याचे विट्याचे माजी नगराध्यक्ष अॅड , वैभव पाटील यांनी सांगितले. या शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील, राष्ट्र वादी काँग्रेस ग्रामीण कार्याध्यक्ष अॅड.बाबासाहेब मुळीक, युवाने ते वैभव पाटील, सचिन शितोळे, विनोद पाटील नितीन दिवटे, विशाल पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी नगरसेवक संजय तारळे कर, सुभाष भिंगार देवे , दहावीर शितोळे , फिरोज तांबोळी, अविनाश चोथे, प्रशांत कांबळे, धर्मेश पाटील, प्रताप सुतार, संजय सपकाळ, सचिन जाधव आदी उपस्थित होते.
विट्यातील शिबीरामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून १७७ बाटल्या