अस्तित्व फाउंडेशन मार्फत गोरगरीब मजुरांसाठी अन्नधान्य किटचे वाटप

अस्तित्व फाउंडेशन मार्फत गोरगरीब मजुरांसाठी अन्नधान्य किटचे वाटप


सांगली दि. १० - अस्तित्व फाउंडेशन, विनायकनगर सांगली यांचे वतीने को विंड १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात संचारबंदी व लॉक डाऊन सुरू आहे सदर काळामध्ये मोलमजुरी करणारे , बेघर, विधवा,अनाथ कुटुंबांना अस्तित्व फाउंडेशन विनायक नगर सांगली यांच्यामार्फत तांदूळ,तूर डाळ, इत्यादी वस्तूंचे किट वितरण संजय नगर पोलीस स्टेशन काकासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी बोलताना पाटील साहेब म्हणाले लॉक डाऊन काळामध्ये अस्तित्व फाउंडे शन मार्फत गोरगरीब मजुरांसाठी अन्नधान्य स्वरूपात किटचे वाटप करून एक स्तुत्य उपक्रम राबविला असून यासारख्या अनेक संस्थांनी या काळी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली याप्रसंगी अस्तित्व फाउंडेशनचे अध्यक्ष मा.शशिकांत नागरगोजे सचिव दीपा नागरगोजे सदस्य संजय गडदे, अशोक परीट तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रभाग ८ मधील कार्यसम्राट नगरसेवक मा, विष्णू अण्णासाहेब माने,सोनाली सागरे कल्पना कोळेकर.मा.राजेंद्र कुंभार, व गणेश विष्णू माने, सदाशिव पाटील, तुकाराम बाबर, विनायक शिंदे, महेश सागरे, जितेंद्र हेगडे,राजेंद्र कदम, प्रा, बबन जाधव,संतोष जोशी, राज चव्हाण मोहन के सरकर, बिरू काळे, सचिन कीत्तरे इ. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अस्तित्व फाउंडेशनच्या वतीने धान्यादी मालाचे वाटप करण्यात आले.